*कोकण Express*
*गेल्या ५ वर्षात कणकवली नगरपंचातीच्या सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्ट्राचार केला – सुशांत नाईक*
*सुलभ शौचालयाच्या कामांत लूट महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायत सत्ताधान्यानी सुलभ शौचालयाच्या कामात मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. ८०० स्क्वेअर फुटची प्लिंथ आहे, साईटवर ती
मापे मोजून आलो आहे. सुलभ शौचालयाचे ८६ लाखांचे अंदाजपत्रक केलं आहे. त्या बांधकामाचा सरासरी १० हजार ७५० रुपये स्क्वेअर फूट दर होत आहे. आता घर बांधायला दिले तर २ हजार रुपये स्क्वेअर फूट मध्ये होत आहे. मात्र, गेल्या ५ वर्षांत कणकवली नगरपंचातीच्या सत्ताधा-यांनी मोठा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला. कणकवली शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, कॉंग्रेस
तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहराध्यक्ष प्रमोद मसुरकर, राष्ट्रवादीचे निखिल गोवेकर, उपाध्यक्ष रुपेश जाधव, जयेश घुमाळे आदी उपस्थित
होते.
कणकवली नगरपंचायतची ५ वर्ष सर्वच नगरसेवकांची पूर्ण झाली आहे. शेवटच्या सभेत सभागृहात भ्रष्टाचार काल काढला, सुलभ शौचालयाच्या कामासाठी केलेले अंदाजपत्रक बोगस आहे, डीएसार प्रमाणे रेट देण्याची आवश्यकता आहे. मात्र, सत्ताधारी लोकांनी मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. कणकवलीत चांगलं कोणतेही काम झालं नाही. १७२ नव्हे तर ३०० कामे मार्गी लागली असतील. ही कामे १० लाख रुपये किंमतीची २० लाख दराने केली आहेत, असा आरोप सुशांत नाईक यांनी केला. कणकवली नगरपंचायत मध्ये गेल्या ५ वर्षात मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. आ. नितेश राणेंना हा भ्रष्ट्राचार तुम्हाला कळायला दिलाच दिला नाही. नाहीतर देवगड प्रमाणे हिस्सा मागितला असता, म्हणून तुमचीही फसवणूक झाली आहे. नितेश राणे म्हणाले कणकवली नगरपंचायत मध्ये पारदर्शक कारभार केला, मात्र, त्यांनी झालेली कामे आणि खर्च पहावा, असे सुशांत नाईक यांनी सांगितले. तसेच रविंद्र मुसळे मृत्यू प्रकरणी हे सत्ताधारी ठेकेदाराच्या पाठीशी राहिले आहेत. या शहरातील कामाची आमदार आणि खासदार यांच्याकडे चौकशी करण्यासाठी मागणी करणार आहोत, असे श्री. नाईक यांनी सांगितले.