क्रेडाई सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी श्री गजानन कांदळगावकर आणि सचिवपदी श्री अभिजीत जैतापकर यांची निवड

क्रेडाई सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी श्री गजानन कांदळगावकर आणि सचिवपदी श्री अभिजीत जैतापकर यांची निवड

*कोकण Express*

*क्रेडाई सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी श्री गजानन कांदळगावकर आणि सचिवपदी श्री अभिजीत जैतापकर यांची निवड*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कुडाळ येथे पार पडलेल्या क्रेडाई सिंधुदुर्गच्या बैठकीत श्री गजानन कांदळगावकर यांची क्रेडाई सिंधुदुर्ग अध्यक्षपदी आणि सचिवपदी श्री अभिजित जैतापकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच खजिनदार पदी श्री अनिल साखळकर उपाध्यक्षपदी शशिकांत पेडणेकर सहसचिवपदी श्री संकेत महाडिक आणि राहुल गोगटे यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष श्री प्रकाश जैतापकर यांनी गेली दहा वर्ष क्रेडाई सिंधुदुर्गचा कार्यभार सांभाळला आणि संस्थेला एक वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले. या दहा वर्षांत बांधकाम क्षेत्राशी निगडित अनेक गोष्टींचा पाठपुरावा क्रेडाई सिधुदुर्ग ने केला. यामध्ये बांधकाम नियमावली, isi, पर्यटन नियमावली तसेच जिल्ह्यातील वाळू व गौण खनिज प्रश्न यांचा समावेश आहे. या कालावधीत मुंबई येथे तीन प्रॉपर्टी एक्स्पो भरवण्यात क्रेडाई सिंधुदुर्ग यशस्वी ठरली कोचिड काळात देखील क्रेडाई सिंधुदुर्गचे काम उल्लेखनीय राहिले आहे. श्री प्रकाश जैतापकर यांच्या यशस्वी वाटेवरच आमची वाटचाल सुरु राहील असे प्रतिपादन नूतन अध्यक्ष श्री गजानन कांदळगावकर आणि सचिव अभिजित जैतापकर यांनी केले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, कुशल कामगार तयार करणे व कामगार सुरक्षा आणि बांधकाम व्यवसाय केंद्रास्थानी ठेवून जिल्ह्याची ब्रड इमेज तयार करणे या त्रिसूत्रिवर आपला भर असेल असे प्रतिपादन नवीन कार्यकारिणीने केले. यावेळी मावळते अध्यक्ष श्री प्रकाश जैतापकर, सचिव श्री अनिल साखळकर, माजी अध्यक्ष संजय पिंगुळकर, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री जीवन रेगे, श्री महेश अंधारी, श्रीकृष्ण केसरकर, संकेत नाईक, संकेत महाडिक, शेखर नाईक, प्रणव कामत, कुंदन केसरकर, सिद्धेश नाईक, अभय वालावलकर, ब्रिजेश कोठावळे, तन्मय माळगावकर, राहुल गोगटे, मनोज महाडीक, सुशील लोके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!