*कोकण Express*
*शरद पवार साहेबांनी घेतलेला निर्णय निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनाला वेदनादायी*
*सिल्व्हर ओक वर उद्या घेणार शरद पवार यांची भेट*
*जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना मांडणार*
*राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अबिद नाईक यांची माहिती*
*सिंधुदुर्ग*
राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यानी पक्षाध्यक्ष पद सोडत राजकीय संन्यास घेण्याचे जाहीर करताच त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. शरद पवार साहेबांनी घेतलेला हा निर्णय आमच्या सारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनाला वेदनादायी आहे. सन्माननीय शरद पवार साहेबांचे नेतृत्व नसेल तर सक्रिय राजकारणात आम्ही तरी काय करायचे ? पवार साहेबांचा हा निर्णय आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी दिली. उद्या 3 मे रोजी मुंबईत सिल्व्हर ओक या पवार यांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेत सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवणार असून आपला निर्णय मागे घेण्याची आग्रही विनंती करणार असल्याचेही अबिद नाईक यांनी सांगितले.