मालवणात धनगर समाजाचा मेळावा घेणार

मालवणात धनगर समाजाचा मेळावा घेणार

*कोकण Express*

*मालवणात धनगर समाजाचा मेळावा घेणार…*

*प्रवीण काकडे ; ग्रामपंचायत सदस्य नवनाथ झोरे यांचा सत्कार…*

*वैभववाडी/प्रतिनिधी*

जिल्ह्यातील धनगर समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. त्यासाठी लवकरच धनगर समाजाचा मेळावा आयोजित केला जाणार असल्याची माहिती ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी देवली ग्रामपंचायत सदस्य नवनाथ झोरे, प्रदिप शिंदे, शंकर शिंदे, अरूण ताटे आदि उपस्थित होते.
श्री. काकडे म्हणाले, जिल्ह्यातील धनगर समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. धनगर वाड्यांमध्ये पाण्याची समस्या आहे. पाण्याच्या उपलब्धतेसाठी धनगर समाजातील बांधवांना तारेवरची कसरत करावी लागते. त्याचबरोबर शिक्षण, वीज, आरोग्य, रोजगार यासंदर्भातील प्रश्नही प्रलंबित आहेत. धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावणे आवश्यक आहे. यासाठी धनगर समाजातील बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र आल्याशिवाय धनगर समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी जिल्ह्यात धनगर समाजाचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात धनगर समाजातील प्रश्न व समस्यांवर चर्चा होईल व त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलण्यात येतील. यावेळी देवली ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या नवनाथ झोरे यांचा प्रविण काकडे यांनी शाल व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, महाराजा यशवंत होळकर यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!