*कोकण Express*
*भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत निगुडे येथे साजरी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत निगुडे येथे साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका अंजलीताई राणे यांनी केले निगुडे गावचे लोकनियुक्त सरपंच समीर गावडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजसेविका आणि शिक्षिका होत्या त्यांनी शिक्षण मिळवून केवळ समाजातील वाईट प्रवृत्तीचा पराभव केला नाही ही तर समाजात अनेक प्रकारचे लिंग भेद होते अशावेळी भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे काम केले यात महात्मा ज्योतिराव फुले यांचाही हात होता अशा या भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेता प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच निगुडे ग्रामपंचायत व अंगणवाडी मार्फत माझी कन्या, भाग्यश्री योजना, बेटी बचाव, बेटी पढाव या योजनेअंतर्गत एक किंवा दोन मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया करून घेतलेले निगुडे गावातील श्री सुनील वसंत आसवेकर व श्री ज्ञानदेव चंद्रकांत गावडे यांचा सहपत्नी शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बालिका दिन म्हणून कुमार पियुष बापू नाईक याला प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले यावेळी निगुडे आशा सेविका श्रीमती भाग्यलक्ष्मी मोरजकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमा प्रसंगी निगुडे गावचे लोकनियुक्त सरपंच श्री समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे, ग्रामपंचायत सदस्या समीक्षा गावडे ,सामाजिक कार्यकर्ते वसंत जाधव, अंगणवाडी सेविका अंजलीताई राणे, रंजना सावंत, नूतन निगुडकर, मदतनीस विजयालक्ष्मी शिरसाठ, लक्ष्मी पोखरे, आशा सेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर, सुनील आसवेकर, ज्ञानदेव गावडे, निधी गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी लवु जाधव,साहिल गावडे, पियुष नाईक, दूर्वा आसवेकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता व आभार उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी व्यक्त केले