*कोकण Express*
*कणकवलीत पुन्हा एकदा स्टॉल हटाव मोहीम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुंबई गोवा महामार्गावरील हायवे चौपदरिकरण उड्डाणपुलाखाली असलेले कणकवली पटवर्धन चौकातील स्टॉल हे हायवे प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हटविण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा हायवे उड्डाणपूला खाली पुन्हा एकदा स्टॉल धारकांनी स्टॉल उभारले. याच पार्श्वभूमीवर हायवे प्राधिकरण चे अधिकारी आणि पोलीस प्रशासन पुन्हा एकदा कणकवली पटवर्धन चौकातील स्टॉल हटाव मोहिमेला दुपारच्या सुमारास उतरले. जेसीबी आणि पोलीस बंदोबस्ताच्या सहाय्याने काही स्टॉल देखील हटवले आहेत.
मात्र कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी अटकाव करत. साहेब हे प्रकार थांबवा. जनसामान्य गोरगरीब जनता या ठिकाणी स्वतःचे पोट भरत •असल्याचे सांगत ही स्टॉल आता मोहीम थांबवली. उड्डाण पुलाखाली स्टॉल हटवून तुम्ही या ठिकाणी गार्डन करणार आहात की या ठिकाणची जागा डेव्हलप करणार हायवे पूर्ण होऊन चार वर्षे झाली चार वर्षात तुम्ही काय केला ते दाखवा ? आणि नंतरच स्टॉल हटवा असे सांगत कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी स्टॉल हटाव मोहीम थांबवली…