*कोकण Express*
*सहा वाळू डंपर पकडले, मालवण तहसिलदारांची कारवाई*
मालवण वाळू उत्खननास परवानगी मिळाली असली तरी मालवण तालुक्यातील खाडीपात्रात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक सुरूच आहे. मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाकडून होणाऱ्या सततच्या कारवाईतून अनधिकृत वाळू उत्खनन वाहतूक सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.
बुधवारी रात्री तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आचरा व वायंगणी मार्गावर अनधिकृत वाळू वाहतूक करणारे सहा वाळू वाहतूक डंपर पकडले. तोंडवळी खाडी किनारी अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक ठिकाणी तहसीलदार यांचे पथक पोहचताच वाळू उत्खनन करणाऱ्या कामगारांनी होड्यांसह पळ काढला. पुढील कारवाईसाठी सहाही डंपर मालवण तहसील कार्यालयात नेण्याची कार्यवाही सुरू होती. अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.