*’रस्सा उडाला भुर्रर्र’ बालकथा*

*’रस्सा उडाला भुर्रर्र’ बालकथा*

*कोकण Express*

*’रस्सा उडाला भुर्रर्र’ बालकथा*

*संग्रहाचे १ मे रोजी तळेरे येथे प्रकाशन*

*कासार्डे ; संजय भोसले*

लेखक प्रमोद कोयंडे यांच्या ‘रस्सा उडाला भुर्रर्र’ या बालकथासंग्रहाचे प्रकाशन सोमवार दि. १ मे २०२३ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. तळेरे येथील जिल्हा परिषद आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा नं.१ येथे हा सोहळा होणार असून शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
सध्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल फोनच्या वापराचे प्रमाण वाढले असून त्याचे विद्यार्थ्यांवर दुष्परिणामदेखील दिसून येत आहेत. यातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची रुची कमी झाल्याचे स्पष्ट जाणवते. ही बाब लक्षात घेऊन मनोरंजनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने लेखक प्रमोद कोयंडे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
लेखकाच्या हेतूचा विद्यार्थीहिताच्या दृष्टिकोनातून विचार करून या बालकथासंग्रहाचे प्रकाशन जि. प. आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ येथे व्हावे आणि शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीमध्ये हे पुस्तक वाचनासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष राजेश जाधव, माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, माजी सरपंच व शिक्षणप्रेमी शशांक तळेकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. तसेच पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी तळेरे गावातील सर्व जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांना हे पुस्तक तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर, निवृत्त पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, प्रथितयश डाॅ. मिलिंद कुलकर्णी यांच्या आर्थिक योगदानातून मोफत वितरित करण्यात येणार आहे.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि पालकवर्ग यांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे आणि आपल्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीच्या कालावधीत आवर्जून भेट द्यावे, असे आवाहन राजेश जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!