ह्यूमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शन या संघटनेच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी पत्रकार संजय शेळके तर उपाध्यक्ष म्हणून ॲड.विवेक गोखले यांची निवड

ह्यूमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शन या संघटनेच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी पत्रकार संजय शेळके तर उपाध्यक्ष म्हणून ॲड.विवेक गोखले यांची निवड

*कोकण Express*

*ह्यूमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शन या संघटनेच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी पत्रकार संजय शेळके तर उपाध्यक्ष म्हणून ॲड.विवेक गोखले यांची निवड*

*कासार्डे संजय भोसले*

ह्यूमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शन या संघटनेच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी पत्रकार संजय शेळके तर उपाध्यक्ष म्हणून ॲड.विवेक गोखले तसेच सचिवपदी अभयसिंह रावराणे यांची निवड करण्यात आली आहे.

ह्यूमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शन या संघटनेच्या वैभववाडी तालुक्याची नुतन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी विशेष बैठक प्रकाश माईणकर यांच्या निवासस्थानी पार पडली.या बैठकी नवीन तालुका कार्यकारिणीच्या निवड करण्यासंदर्भात विचारविनिमय करून कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

यावेळी संघटनेचे निरिक्षक म्हणून उपस्थित असलेले जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संजय खानविलकर यांनी संघटनेच्या कार्याविषयी माहिती देऊन त्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यातील अनेक सार्वजनिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी व अन्यायग्रस्तावरती होणारे अन्याय तसेच त्यांना त्यांचे न्याय,हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक बांधिलकी स्वीकारून संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कृतीतून कार्याचा ठसा उमटवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी कार्य तत्परतेने कार्य करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन याप्रसंगी केले.तसेच संघटनेच्या कार्यप्रणाली विषयीची माहिती दिली.

यावेळी चर्चा करून सात जणांची कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली.ती कार्यकारीणी पुढील प्रमाणे- नुतन तालुका अध्यक्ष म्हणून पत्रकार- संजय शेळके, उपाध्यक्ष- ॲड.विवेक गोखले, सचिव म्हणून अभयसिंह रावराणे, निरिक्षक- प्रकाश माईणकर, जनसंपर्क अधिकारी- ॲड.विक्रमसिंह काळे, संघटक- सचिन सावंत, महिला संघटक- म्हणून सौ.अक्षता जैतापकर यांची निवड करण्यात आली.

नुतन तालुकाध्यक्ष संजय शेळके यांनी उपस्थितांचे स्वागत करुन संघटनेने आपल्यावरती जी जबाबदारी दिली आहे.ती संघटनेच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन वैभववाडी तालुक्यातील बऱ्याचशा प्रलंबित समस्या व प्रश्नांबाबत निश्चितच आवाज उठवून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

या निवडीच्या वेळी निरिक्षक म्हणून संघटनेचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पत्रकार संजय खानविलकर उपस्थित होते.त्यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.शेवटी तालुका निरिक्षक प्रकाश माईणकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!