भाजपच्या माणगाव माजी सरपंचासह चार जणांकडून बेदम मारहाण:पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भाजपच्या माणगाव माजी सरपंचासह चार जणांकडून बेदम मारहाण:पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

*कोकण Express*

*भाजपच्या माणगाव माजी सरपंचासह चार जणांकडून बेदम मारहाण:पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

माणगाव तळावाडी येथील अमित सखाराम कदम यांना मारहाण केल्याप्रकरणी माणगावचे माजी सरपंच तथा भाजपचे विभागीय अध्यक्ष असलेले सचिन धुरी यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित कदम यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीत माणगाव तळीवाडी येथील सचिन धुरी याने, “मळा येथे खाली ये” असे सांगितले. आपण त्या ठिकाणी गेल्यावर तिथे सचिन धुरी, नागेश सावंत,राजू भगे,विनोद भिसे सर्व राहणार माणगाव तळीवाडी उपस्थित होते. यावेळी तेथे असलेल्या नागेश सावंत यांनी लाकडी दांड्याने आपल्या कानाच्या वर मारले. याचवेळी राजू भले व विनोद भिसे यांनी तोंडात पाठीवर ठोशाने मारले. तर सचिन धुरी यानी आपणास बेदम समाधान केले यानंतर आपण मारहाण केली.यानंतर आपण आपल्या घरी गेलो.23 एप्रिल रोजी आपण व सचिन धुरी यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. सचिन धुरी हे ग्रामपंचायत सदस्य असून ग्रामपंचायतच्या नळपाणी नियोजनाचे काम त्यानेमी घेतले आहे त्याची पाईप लाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या उजव्या बाजूने खोदल्याने त्याची माती रस्त्यावर आली होती.ती माती काढण्यासाठी सचिन धुरी यांना अमित कदम यांनी सांगितले होते. २३ रोजी आठ वाजता त्याचा डंपर या मातीमध्ये रुतून बसला होता. यावेळी आपण खोदाई करून ठेवलेली माती का काढली नाही, याची विचारणा कामाचा ठेका घेतलेल्या सचिन धुरी यांना केली होती. या विषयावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. अशी फिर्याद अमित कदम यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी भाजपचे माजी सरपंच, प्रभाग 5 चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि विभागीय अध्यक्ष असलेले सचिन धुरी,भाजपचे ग्रामपंचायत सदस्य नागेश मधुकर सावंत, राजू रत्नाकर भगे, विनोद मोहन भिसे सर्व राहणार माणगाव तळेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!