*कोकण Express*
*ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ यांच्यावतीने 30 एप्रिल ते 4 मे यावेळी मळेवाड पर्यटन महोत्सव 2023 चे आयोजन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे यांच्या वतीने 30 एप्रिल ते 4 मे या कालावधीत मळेवाड येथे मळेवाड पर्यटन महोत्सव २०२३ चे आयोजन केले आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे च्या सहकार्याने व युवा मित्र मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे आयोजित 30 एप्रिल ते 4 मे 2023 या कालावधीत भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 चे आयोजन केले आहे.या महोत्सवाच्या पहिला दिवशी 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 वा.
श्री गणेश मूर्तीवर अभिषेक व धार्मिक कार्यक्रम
सकाळी 10 वा. – श्री सत्यनारायण महापूजा,रात्रौ 07:30 वा हेळेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग *मायासंग्राम*
दुसरा दिवस 1 मे 2023 रोजी सकाळी 08:30 वाजता
मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे, युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे,संत समाज मळेवाड व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने *महारक्तदान शिबिर*,रात्रौ 07:30 वा. – केशव खांबल प्रस्तुत श्री सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ, दोडामार्ग यांचा नाट्यप्रयोग *शापमुक्त* तिसरा दिवस 2 मे 2023 रोजी
रात्रौ 09:00 वा. सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ.रात्रौ 09:30 वा. – गाव *मर्यादित रेकॉर्ड डान्स व वेशभूषा स्पर्धा,तसेच जिल्हास्तरीय निमंत्रित रेकॉर्ड डान्स स्पर्धा*,चौथा दिवस 3 मे 2023 रोजी रात्रौ 09:30 वा. – वैभवी क्रिएशन, डिचोली (गोवा) निर्मित आणि अमर फाळकर प्रस्तुत दोन अंकी धमाल विनोदी नाट्यप्रयोग *माझ्या मित्राची बायको* तर पाचवा दिवस 4 मे 2023 रोजी
रात्रौ 09:30 वा.*सिंधु सुंदरी 2023* सौंदर्य स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.तरी सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरपंच तथा युवा युवा मित्र मंडळ अध्यक्ष हेमंत मराठे तसेच ग्रामपंचायत सदस्य,युवा मित्र मंडळ पदाधिकारी यांनी केले आहे.