*कोकण Express*
*कणकवलीचेची जनताच पुन्हा भाजपा कडे सत्ता देईल आ . नितेश राणे*
*कणकवली नगरपंचायतचे काम जिल्ह्यात आदर्शवत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायत ने मागील पाच वर्षात उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळेच कणकवली नगरपंचायतीचे महाराष्ट्रात नाव झाले. कर वसुलीमध्ये प्रथम क्रमांक मिळाला त्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह सर्वच सत्ताधारी नगरसेवकांचा आमदार नितेश राणे यांनी सत्कार करत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. कणकवलीचेची जनताच पुन्हा भाजपा कडे सत्ता देईल असा विश्वास भाजपा जा. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
मागील पाच वर्ष कणकवलीच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू दिला नाही. विकासात्मक कामे आपण कणकवली वासियांसाठी केली आहेत. त्यामुळे कणकवलीतील नागरिकच आमच्या पाठीशी राहतील. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, चारू साटम, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.