*कोकण Express*
*आ. नितेश राणे धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे मतदार संघात जेव्हा दौरा करतात तेव्हा प्रत्येक छोट्या मोठ्या घटनांकडे ते डोळसपणाने पाहत असतात: आत्मीयता जनते प्रति असलेले प्रेम आणि विकासाची असलेली धडपड त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. रस्त्यावरून जात असताना सुद्धा एखादी घटना त्यांच्या नजरेतून सुटत नाही. यापूर्वीही रस्त्यावर अपघात झाले तेव्हा ते आपला दौरा अर्धवट टाकून मदत कार्यासाठी अनेक वेळा उतरले.
अशीच एक घटना खारेपाटण येथे कार्यक्रमासाठी जात असताना महामार्गावर नडगिवे घाटीत घडली. कंटेनर पलटी होऊन अपघात झाला या अपघातातील जखमी ड्रायव्हरला बाहेर काढून घाबरलेले ड्रायव्हर व त्याच्या सहकाऱ्यांना धीर देत तातडीने उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये पाठवले. माणुसकीचे दर्शन लोकप्रतिनिधी म्हणून आमदार नितेश राणे यांचे सातत्याने दिसून आलेले आहे.