भाजपा कडून भूमी सचिन परुळकर चा सन्मान

भाजपा कडून भूमी सचिन परुळकर चा सन्मान

*कोकण Express*

*भाजपा कडून भूमी सचिन परुळकर चा सन्मान*

भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग च्या वतीने गुरुकुल प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात पाचवी आल्याबद्दल तुळस श्री वेताळ विद्या मंदिर, तुळस प्रशलेची इ.१ ली ची विद्यार्थिनी भूमी सचिन परुळकर हिचा शाल, श्रीफळ,बुके आणि भेटवस्तू देऊन तुळस सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी बोलताना जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई म्हणाले की पहीलीतील मुलीने घेतलेली राज्यस्तरीय भरारी कौतुकास्पद आहे . ग्रामीण भागातील मुलीने मिळविलेल्या यशात शिक्षकांंबरोबर तिच्या आई वडीलांचा पण सहभाग आहे . त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे सांगितले .
यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवडळकर, तुळस उपसरपंच सचिन नाईक, खरेदी विक्री संघ वेंगुर्ला चे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , ता.सरचिटणीस बाबली वायगणकर, माजी सरपंच शंकर घारे , ब्राम्हण समाज तालुक्याध्यक्ष श्रीकांत रानडे , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , पुंडलिक हळदणकर , कृष्णा हळदणकर, ग्रा.प.सदस्य जयवंत तुळसकर, सदस्या चरित्रा परब ,अपर्णा गावडे , विनिता शेटकर , नारायण कोचरेकर , माजी ग्रा. प. सदस्य चंद्रे परब , तुळस वाचनालय अध्यक्ष सगुण माळकर व खजिनदार प्रकाश परब, संतोष राऊळ , संजय चुडजी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!