*कोकण Express*
*श्री.साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टचा 23 वा वर्धापदिन…!*
*धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…!*
*या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष काशीराम परब उपाध्यक्ष प्रतीक परब यांनी केले…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
श्री.साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट 23 वा वर्धापदिन दिन उत्सव सोहळा गुरूवार दि. 27 एप्रिल रोजी श्री. साईनाथ मंदिर कुपवडे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
त्या निमित्ताने श्री. दत्त याग यज्ञ आयोजित विविध कार्यक्रमाचे आयोजन पहाटे 5.30 वा. बाबांची काकड आरती, सकाळी 6.30 वा. अभिषेक व साईबाबांची आरती, सकाळी 8 ते 11.30 श्री. दत्त याग यज्ञ, दुपारी 12.00 वा.मध्यान्ह आरती, दुपारी, 12.30 वा. महाप्रसाद (साई भंडारा), सायं.5.30 वा. बाबांची मिरवणुक, सायं.7.30 ते 9.00 वा. सुस्वर भजन व किर्तन, रात्रौ ठीक 9.00 वा. बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य प्रयोग ” वेडा चंद्रहास ” सादर होणार आहे.
तरी साई दर्शनाचा भाविकांनी उपस्थित राहावे असं आवाहन अध्यक्ष श्री.काशीराम परब शेठ तसेच उपाध्यक्ष श्री प्रतीक काशीराम परब यांनी केले आहे.