*कोकण Express*
*नृत्यांच्या माध्यमातून “ग्लॅमर” मिळते, भविष्यात मुलांना अनेक संधी…*
*लखमराजे भोसले; सावंतवाडी ओंकार कलामंचाच्या नृत्य प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथिल ओंकार कलामंचाच्या “डान्स अॅकेडमी” च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नृत्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नृत्यांच्या माध्यमातून मुलांना “ग्लॅमर” मिळते, त्याच बरोबर रोजच्या जीवनात व्यायाम झाल्यामुळे शरीर तंदुरुस्त होण्यासाठी मदत होते. त्यामुळे पालकांनी सुट्टीच्या काळात अशा सेमिनार मध्ये मुलांना पाठवून त्यांच्या अंगातील कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सावंतवाडी येथिल ओंकार कलामंचाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उदघाटन श्री.भोसले यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,ओंकार कलामंचाचे अध्यक्ष तथा सिंधुदूर्ग जिल्हा सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, कोरीओग्राफर अनिकेत आसोलकर, एल. एम. सावंत, ब्रेकींग मालवणीचे ब्युरो चिफ शुभम धुरी, प्रहार डीजीटलचे ब्युरो चिफ सिध्देश सावंत,भुवन नाईक, चैतन्य सावंत, हेमंत पांगम, नारायण पेंडुरकर, कीसन धोत्रे,अभिषेक लाखे, जान्हवी सारंग, योगिता बेळगावकर, आरती राऊळ, पूजा पारधी, खुशी वेंगुर्लेकर, रसिका धुरी, आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. साळगावकर पुढे म्हणाले, या ठीकाणी गेली अनेक वर्षे सावंतवाडी महोत्सवात होणार्या कार्यक्रमा सारखे कार्यक्रम ओंकार कलामंचाच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहेत. या अंतर्गत चालविल्या जाणार्या डान्स अॅकेडमीच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकार घडले आहेत. आणि मुंबई पुण्यातील मोठ्या शहरात मिळणारे नृत्याचे धडे या ठीकाणी दिले जात आहेत. हे कौतूकास्पद आहे. त्यांचा हा प्रवास असाच सुरू रहावा, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.