*कोकण Express*
*आमदार नितेश राणेंची प्रांताधिकारी कातकर यांनी घेतली सदिच्छा भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली चे नूतन प्रांताधिकारी ऍड. जगदीश कातकर यांनी आमदार नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. यावेळी कणकवली तहसीलदार रमेश पवार उपस्थित होते. कणकवली देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांचे प्रांताधिकारी म्हणून ऍड. जगदीश कातकर यांनी अलीकडेच कार्यभार हाती घेतला आहे. त्यानंतर आज आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान जनताभिमुख प्रशासकीय कारभार करून जनतेच्या अडचणी सोडवण्यावर भर देण्याबाबत चर्चा झाली. प्रांताधिकारी ऍड जगदीश कातकर यांना आमदार नितेश राणे यांनी प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.