*कोकण Express*
*अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी सुवर्ण मोहत्सवी वाढदिवस ओणी येथील वात्सल्य मंदिर गोकुळ च्या चिमुकल्यासह केला साजरा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दुसऱ्याच्या सुखदुःखात निर्हेतुकपणे …समरसपणे सहभागी होत त्यांचे आयुष्य समृद्ध करत आपल्या जीवनात आनंदी रहाणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवन जगणे ,या समर्पित विचारांचा मागोवा घेत ,अनाथ,निराधार मुलांच्या जीवनासाठी दिशादर्शक होणारी सेवाभावी संस्था म्हणजे राजापूर ओणी येथील वात्सल्य मंदिर गोकुळ संस्था ….सिंधुरत्न फाऊंडेशन च्या अध्यक्षा अभनेत्री अक्षता कांबळी यांनी आपला पन्नासा वा वाढदिवस आश्रमातील चिमुकल्यानसमवेत २४एप्रिल रोजी उत्साहात साजरा केला .निसर्ग रम्य वातावरणात वात्सल्य मंदिर आश्रम आहे ओंणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित ऍड वासुदेव शंकर तुळसकर ज्ञान मंदिर संकुल येथे राष्ट्र दल निवासी शिबीर मध्ये वास्तल्य मंदिर व पंचक्रोशीतील पन्नास ते साठ मुलं हजर होती ,यावेळी वात्सल्य मंदिर चे सर्वेसर्वा डॉ महेंद्र मोहन,देवी काका ,कार्यकारिणी सदस्य रुपेश रेडेकर ,मनोजकुमार,सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार ,अर्पिता मुंबरकर ,अनिल कांबळी आणि तेथील सर्व कर्मचारी हजर होते, यावेळी अक्षता कांबळी यांनी रोख रक्कम देऊन वात्सल्य मंदिर ला मदत केली आणि चिमुकल्या समवेत केक कापून आनंद द्विगुणित केला ,तेथील मुलांनी आपल्या हस्ते तयार केलेली शुभेच्छाभेट कार्ड कांबळी यांना दिली तसेच कलाक्षेत्रातील काही गोष्टी चे मुलांना मार्गदर्शन केले व अभिनय करून मुलांना आनंदित केले ,या आश्रम मध्ये जाऊन आजचा सुवर्ण मोहत्सवी दिवस सार्थकी लागला याच सर्व श्रेय आपली मैत्रीण सरिता पवार यांना त्या देतात