*कोकण Express*
*वराड-सोनवडे पुलाच्या गतिमान कामाचे श्रेय निलेश राणे यांचेच !*
*श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार व आमदार यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी…*
*भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परभणी यांचा हल्लाबोल*
*मालवण ः प्रतिनिधी*
कर्ली नदी पात्रावरील वराड-सोनवडे पुलाच्या गतिमान कामाचे श्रेय निलेश राणे यांचेच आहे. गावातील जनता याची साक्ष आहे. असे असताना या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. नौटंकी बंद करावी, असा हल्लाबोल भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी केला आहे.
MELORRA Everyday Fine Jewellery 18000+ | 22KT
AX
–
खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या मागील साडेसात वर्षे कारभारात वराड पुलाचे काम रखडले. कामास कोणतीही गती मिळत नव्हती. पुलाचे काम लवकर व्हावे यासाठी ग्रामस्थांना आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागली. त्यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे त्या ठिकाणी पोहचले. अधिकारी, ठेकेदार यांना कडक शब्दात समज देत काम योग्य पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सांगितले. त्यानंतर पुन्हा एकदा निलेश राणे यांनी बराड पुलाच्या ठिकाणी जाऊन कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. स्थानिक पदाधिकारी, अधिकारी यांच्या संपर्कात राहून कामाच्या प्रगतीचा सातत्याने आढावा सुरू ठेवला. मागील आठ वर्षे रखडलेल्या कामास गती •मिळाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचीही भूमिका काम गतिमान होण्यास महत्वपूर्ण ठरली.
असे असताना केवळ फुकाचे श्रेय घेण्यासाठी वराड पुलाच्या ठिकाणी येत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक नौटंकी करत आहेत. आठ वर्षांतील अपयश लपवण्याचे काम खासदार, आमदार करत आहेत. जनाची नाही निदान मनाची लाज यांनी बाळगावी. असा प्रहार चिंदरकर, परब यांनी केला.
जर भाजप युती सरकारच्या कामांचे श्रेय घेण्याची हौस आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांना असेल तर आम्ही भाजप युती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील मंजूर कामांची यादी देतो. गावागावात जाऊन आमदार, खासदार यांनी या यादीचेच वाचन करावे. असा टोलाही भाजप तालुकाध्यक्ष चिंदरकर, जिल्हा बँक संचालक परब यांनी लगावला..
भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत जप कार्यालय येथील बैठकीत धोंडी चिंदरकर, बाबा परब यांनी याबाबत भूमिका मांडली. यावेळी आबा हडकर, राजू बिडये, गदार लुडबे, भाई मांजरेकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.