जागतिक “पुस्तक दिना निमित्त देवगड येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन.

जागतिक “पुस्तक दिना निमित्त देवगड येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन.

*कोकण Express*

*जागतिक “पुस्तक दिना निमित्त देवगड येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन…..*

*देवगड ः प्रतिनिधी*

येथील बर्वे ग्रंथालयात उमाबाई व प्रथालयाच्यावतीने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन शेठ म. ग. हायस्कूलचे शिक्षक प्रविण खड़पकर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान हे ग्रंथप्रदर्शन २९ एप्रिल पर्यंत सर्वासाठी खुले राहिल तसेच ग्रंथालयाच्या सर्व वाचकांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी श्री. खडपकर म्हणाले, २३ एप्रिल हा विख्यात साहित्यिक विल्यम शेक्सपीयरचा स्मृतीदिन म्हणून ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा केला जातो. या दिनानिमित्त जगातील सर्व नामवत लेखकाना आदरांजली वाहण्यात येते. पुस्तके ही जगण्याची अनुभुती देतात. पुस्तकामुळे अनेक विचारवताना प्रेरणा मिळाली आहे. लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचे विविध भाषामधून अनुवाद होत असतात त्यामुळे साहित्याच्या कक्षा रूंदावतात आणि लेखन कला विकसित होते, समाज वाचनाभिमुख करण्यासाठी ग्रंथालयांनी जास्तीत जास्त वाचक चळवळ वृध्दिंगत करावी, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!