भाजपा नेते निलेश राणेंची वचनपूर्ती

भाजपा नेते निलेश राणेंची वचनपूर्ती

*कोकण Express*

*भाजपा नेते निलेश राणेंची वचनपूर्ती*

*पोखरण वरचीवाडी मोरी बांधकामासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या माध्यमातून ८ लक्ष निधी मंजूर*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

भाजपा नेते निलेश राणे काही दिवसापूर्वी कुडाळ दौ-यावर असताना त्यांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर कामांची भूमिपूजन करण्याकरीता पोखरण येथे भेट दिली होती. यावेळी पोखरण येथे महापुरुष वरचीवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावरील खचलेल्या मोरीची पहाणी निलेश राणे यांनी यावेळी केली होती. किमान ३५० लोकवस्तीच्या या भागाचा मोरी खचल्याने पावसाळ्यात मुख्य रस्त्यापासून संपर्क तुटणार होता त्यावर पोखरण ग्रामस्थांनी तातडीने या मोरी बांधकामासाठी • निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, त्यानुसार तातडीने केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून ८ लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देत निलेश राणे यांनी पोखरण ग्रामस्थाची समस्या मार्गी लावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!