*कोकण Express*
*कुडाळ नगरपंचायत कार्यालयाच्या पायरीवर भाजपा नगरसेवकांची जोरदार निदर्शने*
*खाली मुंडी पाताळ धुंडी 27 लाखाची घसरगुंडी खोके एकदम ओके..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
नगरपंचायत कार्यालयच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. महाविकास आघाडीचा निषेध असो . अशा अनेक घोषणांनी नगरसेवकांनी आज सर्वसाधारण सभेच्या अगोदर कुडाळ नगरपंचायत ” सत्ताधारी काँग्रेस – ठाकरे सेना ” यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. कुडाळ नगरपंचायत च्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या बालोद्यान मध्ये 27 लाखाची एक घसरगुंडी बसवण्यात आली खरे तर 27 लाखांमध्ये दुमजली प्रशासकीय इमारती उभ्या राहतात. परंतु केवळ एका घसरगुंडीलाच एवढा खर्च सत्ताधाऱ्यांनी खर्च केल्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी मागणी भाजपा नगरसेवकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. या पार्श्वभूमीवर या भ्रष्टाचार विरोधात. त्याचबरोबर पंधरा दिवसात 500 कुत्र्यांवर जो लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला यातही मोठा भ्रष्टाचार झाला या विषयावर जोरदार निदर्शने केली .यावेळी भाजपा नगरसेवकांनी एकजुटीने सत्ताधाऱ्यांना विरोधात पोलखोल आंदोलन केले.