*कोकण Express*
*वैभववाडीतल ठाकरे गटाचे 3 नगरसेवकांनी भाजपामध्ये केला प्रवेश*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
भाजपा आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सेनेला जोरदार दणका देत वैभववाडीत राजकीय भूकंप घडवून आणला आहे केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेचे वैभववाडी नगरपंचायत मधील बलाढ्य असे 3 नगरसेवक भाजपात दाखल झाले आहेत. ठाकरे शिवसेनेचे वैभववाडी शहरप्रमुख तथा नगरसेवक प्रदीप रावराणे, श्रद्धा रावराणे आणि सुभाष अनाजी रावराणे या तीन नगरसेवकांनी आज मुंबईत भाजपात प्रवेश केला. तसेच ठाकरे सेनेचे वैभववाडी युवा सेना तालुका प्रमुख रोहित रावराणे यांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी नगरसेवक संताजी रावराणे, प्रशांत रावराणे, आशिष रावराणे आदी उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे वाभवे वैभववाडी नगरपंचायत मध्ये भाजपाचे 14 तर ठाकरे सेनेचे केवळ 3 नगरसेवक असे बलाबल झाले आहे.