माड बागायतीत अतिक्रमण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार

माड बागायतीत अतिक्रमण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार

*कोकण Express*

*माड बागायतीत अतिक्रमण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार…*

*वायंगणी कोंडूरा येथील शेतकरी आक्रमक ; थेट कोकण आयुक्तांना निवेदन सादर…*

कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग या कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी व क्षेत्रीय कंट्रक्शन कोल्हापूर यांच्या कामगारापासुन आमच्या माड बागायतीमध्ये वावरणाऱ्या आमच्या बायका मुलांना धोका निर्माण झाला असून या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग व क्षत्रिय कंट्रक्शन कोल्हापूर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वायंगणी कोंडूरा येथील अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांनी कोकण आयुक्त यांचे जवळ लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
वायंगणी कोंडुरा येथे तळेकरवाडी सर्वे नंबर 89 हिस्सा नंबर 3 व सर्वे नंबर 87 हिस्सा नंबर 1 या आमच्या सामायिक माड बागायती आहेत. मालक व कुळ यांची सुमारे 50 ते 60 नावे असलेले सातबारा असून सदर सातबारा मध्ये माड बागायत विक्री तहकूब असा शेरा आहे तसेच सदर माड बागायती ही थेट समुद्राला लागून असल्याने सी आर झेड 1 मध्ये येते.
आमच्या माड बागायती मधून यापूर्वी कुठलाही रस्ता गेलेला नाही तसेच आमच्या माड बागायती मधून रस्ता करण्यासंदर्भात आम्ही कुणालाही बक्षीस पत्र अथवा खरेदी खताने आमच्या जमिनी दिलेल्या नाहीत व देणार ही नाही. असे असतानासुद्धा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून प्रस्तावित असलेल्या खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या रस्त्याच्या नावाखाली संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून बेकायदेशीर रस्ता करण्याचा प्रयत्न चालवला आहे याबाबत गेल्या अनेक महिन्यापासून मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग,मा. कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग, मा.पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग,मा. तहसीलदार साहेब वेंगुर्ले, क्षत्रिय कंट्रक्शन कोल्हापूर या सर्वांना लेखी निवेदने वारंवार देऊन देखील कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग व क्षत्रिय कंट्रक्शन कोल्हापूर यांचे अधिकारी व कर्मचारी थेट आमच्या माड बागायती मध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करून मोजमापे घेणे ,माड बागायतीमध्ये कब्जा करण्याच्या उद्देशाने माती पसरवणे असे प्रकार पुन्हा एकदा करत आहेत. यापूर्वी आमच्या माड बागायतीमध्ये बेकायदेशीर मातीची खोदाई करून माड बागायतीचे नुकसान केलेले आहे याबाबत आपल्या विभागाच्या संबंधित खात्यांना लेखी निवेदने देऊन रीतसर तक्रार केलेली होती परंतु आम्हा शेतकऱ्यांच्या तक्रारीची आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे यापुढे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग व क्षत्रिय कंट्रक्शन कोल्हापूर यांचे अधिकारी व कर्मचारी यांचे कडून आमच्या माड बागायती मध्ये पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेल्यास आमच्या बायका मुलांसह सर्वांना माड बागायतीमध्ये उतरून जशास तसे उत्तर द्यावे लागेल व यावेळी होणाऱ्या परिणामास घडणाऱ्या अनुचित प्रकारास संबंधित खात्यांचे अधिकारी व कर्मचारी हेच सर्वस्वी जबाबदार राहतील असे वायंगणी कोंडूरा येथील अन्याय ग्रस्त शेतकरी नारायण पेडणेकर,प्रशांत पेडणेकर, सौ.प्रणाली पेडणेकर,सौ.निता पेडणेकर, सुमित्रा पेडणेकर यांनी कोकण आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!