कासार्डेत जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा शिबीर संपन्न

कासार्डेत जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा शिबीर संपन्न

*कोकण Express*

*कासार्डेत जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा शिबीर संपन्न*

*आठही तालुक्यातील ४२ पंच परीक्षेला प्रविष्ट : महिलांची उपस्थिती लक्षणीय!*

*कासार्डे ; संजय भोसले*

शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ,
सिंधुदुर्गवतीने तसेच वैभववाडी तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय पंच परीक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराला आठही तालुक्यातील ४२ परीक्षार्थ्यीनी हजरी लावली होती यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
या दोन दिवसीय शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजी आम.अजित गोगटे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रजनन करून झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर कासार्डे शिक्षण संस्थेच्या स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, संस्थापदाधिकारी तथा माजी सैनिक रवींद्र पाताडे, प्राचार्य एम.डी.खाड्ये, सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष बयाजी बुराण, सचिव दिनेश म्हाडगुत, राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड, जेष्ठ क्रीडा शिक्षक तथा जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत कानकेकर, शिबीराचे तज्ञ मार्गदर्शक तथा राष्ट्रीय पंच अजित पाटील(कोल्हापूर), संतोष भोसले (रत्नागिरी), मनोज जाधव (सातारा),
मधुकर पाटील (सिंधुदुर्ग), कबड्डी फेडरेशन सिंधुदुर्गचे जिल्हा पदाधिकारी संजय पेडणेकर,मार्टिन अल्मेडा,
दिलीप वाडकर ,राष्ट्रीय पंच सुदिन पेडणेकर,राज्य पंच कु.वैदही नर,दशरथ काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण यांनी कबड्डी पंच परीक्षा व शिबीरासंदर्भात सविस्तर विवेचन करून कबड्डी खेळासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त अधिकृत पंच तयार व्हावेत तसेच पंचांची कार्ये परीक्षार्थींना सविस्तर समाजावीत म्हणून दोन दिवसीय पंच शिबीराचे आयोजन केल्याचे सांगितले.
याप्रसंगी आयोजकांच्या वतीने बयाजी बुराण,मधुकर पाटील व दिनेश म्हाडगुत यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन येथोचित सन्मान करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी स़ंजय पाताडे, अरविंद कुडतरकर व राष्ट्रीय पंच अजित पाटील,मधुकर पाटील यांनीही मनोगत व्यक्त करतांना परीक्षार्थ्यीना शूभेच्छा दिल्या.
*बदलत्या काळानुसार पंचांनी अपडेट व्हावं:* -अजित गोगटे
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना, अॅड.अजित गोगटे म्हणाले की, कबड्डीत पंचांचा निर्णय जरी अंतिम असला तरी, नवनवीन नियमानुसार पंचांनी काळानारूप अपडेट व्हायलाच हवं तरच,आपण बदलत्या नियमानुसार मैदानावर आत्मविश्वासाने उभे राहू असाही सल्ला त्यांनी दिला. तसेच पंच परीक्षेसाठी व शिबीरासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल कासार्डे शिक्षण संस्थेला त्यांनी धन्यवाद देऊन उपस्थित परीक्षार्थ्यीना शूभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कासार्डे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी केले तर आभार जिल्हा सचिव दिनेश म्हाडगुत यांनी मानून उद्घाटन सोहळ्याची सांगता केली.
शनिवारी पहिल्या सत्रात राष्ट्रीय पंच अजित पाटील (कोल्हापूर) व मधुकर पाटील(सिंधुदुर्ग) यांनी शिबीराला विशेष मार्गदर्शन आणि शिबीरार्थ्यींच्या विविध शंकांचे निरसन केले.
या शिबिराला जिल्हातील आठही तालुक्यातील ४२ पेक्षा अधिक परीक्षार्थ्यीनी सहभाग घेतला होता.
दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळच्या सत्रात राष्ट्रीय पंच मनोज जाधव (सातारा), संतोष भोसले (रत्नागिरी) यांनी परीक्षार्थींना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनंतर प्रश्नोत्तरांचे सत्र संपन्न झाले.
याशिवाय स.११.३० वा १००गुणांची लेखी परीक्षा तर दुपारच्या सत्रात ५०गुणांची तोंडी व ५०गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.या प्रात्यक्षिक परीक्षेला कासार्डे माध्यमिक विद्यालयातील कबड्डी खेळाडुंचे विशेष सहकार्य लाभले.
*सर्वच क्षेत्रातील परीक्षार्थ्यी बरोबरच महिलांची उपस्थिती लक्षणीय !*
या पंच परीक्षेसाठी माध्यमिक, प्राथमिक, शाळेतील शिक्षक, प्राध्यापक, विविध क्षेत्रातील नोकरवर्ग,युवा कबड्डी खेळाडू आणि महिला कबड्डीपट्टुची उपस्थिती लक्षणीय होती.
…………………………….
नेटक्या आयोजन व नियोजनबध्दल उपस्थित परीक्षार्थ्यीनी आयोजकांचे विशेष कौतुक करून धन्यवाद दिले.
ही जिल्हास्तरीय कबड्डी परीक्षा यशस्वी होण्यासाठी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण, सचिव दिनेश म्हाडगुत, राष्ट्रीय पंच मधुकर पाटील, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड,रूपेश बांदेकर, कासार्डे प्रशालेतील शिक्षक प्रा.दिवाकर पवार,अनिल जमदाडे, यशवंत परब, ऋषिकेश खटावकर,नवनाथ कानकेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!