*कोकण Express*
*आमदार नितेश राणे 25 एप्रिल पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टीचे कणकवली- देवगड- वैभववाडी चे आमदार नितेश राणे हे मंगळवार २५ एप्रिल पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर
येत आहेत. या दौऱ्या दरम्यान आमदार नितेश राणे हे ग्रामस्थ, शेतकरी, मच्छीमार, शिक्षक, कर्मचारी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी विकास कामांवर आणि जनतेच्या मागण्यांवर चर्चा करणार आहेत. विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. संघटनात्मक बैठकांसाठी ते उपस्थित राहणार आहेत. कणकवली तालुक्यातील कळसुली-देदनवाडी धरणात ‘बोटिंग व फिशिंग’ प्रकल्प सुरु २५ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांचे शुभ असते शुभारंभ केला जाणारा आहे.