कुमार. अक्षय मुसळे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल श्री. सत्यवान रेडकर यांच्यामार्फत सत्कार

कुमार. अक्षय मुसळे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल श्री. सत्यवान रेडकर यांच्यामार्फत सत्कार

*कोकण Express*

*कुमार. अक्षय मुसळे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल श्री. सत्यवान रेडकर यांच्यामार्फत सत्कार*

*कासार्डे ; संजय भोसले*

2018 या वर्षी सैन्य दलाच्या परीक्षेत अंतिम प्रयत्नात मैदानी चाचणीत अपयश प्राप्त झाल्यानंतर नैराश्य आले. सहा वर्ष विविध परीक्षांना प्रविष्ट होऊन अपयशांना सामोरे जावे लागले तरीही खचून न जाता परिश्रम करून, तिमिरातुनी तेजाकडे या चळवळीतील सावरकर नगर, ठाणे येथील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी, कु. अक्षय मुसळे यांचे महाराष्ट्र पोलीस दलात ठाणे शहर पोलीस पदावर निवड झाल्याबद्दल कोकण सुपुत्र, तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी संस्थेचे सचिव, श्री. संजय चिचकर व मुसळे कुटुंबीय उपस्थित होते.

“महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांद्वारे ध्येय गाठण्यासाठी निरंतर मेहनत करत रहावे, नियमित अभ्यास करावे, मार्गदर्शनासाठी नेहमी माझ्या संपर्कात रहावे” असे आवाहन श्री. सत्यवान रेडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!