*कोकण Express*
*शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या जिल्हा दौऱ्यावर…..*
*सिंधुदुर्गनगरी, ता. २३ :*
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे उद्या सोमवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार २४ एप्रिलला सकाळी ७.५ वा. मोपा (गोवा) विमानतळ येथून शासकीय मोटारीने आडाळी एमआयडीसीकडे प्रयाण. सकाळी ८ वा. आडाळी एमआयडीसी येथे आगमन व पाहणी. सकाळी ९ वा. आडाळी एमआयडीसी येथून शासकीय मोटारीने मोपा (गोवा) विमानतळाकडे प्रयाण.