*कोकण Express*
*युवा उद्योजक विशाल परब यांच्या माध्यमातून बांद्यात ईदच्या शुभेच्छा…*
*बांदा ः प्रतिनिधी*
रमजान ईदचे औचित्य साधून भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी बांद्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी उपसरपंच जावेद खतीब व माजी सरपंच अक्रम खान यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच शहरातील अन्य मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.भाजपा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, सिद्धेश महाजन, दीपक सावंत, साई धारगळकर, बाळु मोर्ये, संदीप बांदेकर, सतीश येडवे, अनुप महाजन, तन्वीर खतीब आदी उपस्थित होते.