कासार्डे माध्य. विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मुंबईत स्नेह मेळावा

कासार्डे माध्य. विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मुंबईत स्नेह मेळावा

*कोकण Express*

*कासार्डे माध्य. विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मुंबईत स्नेह मेळावा*

*कासार्डे; संजय भोसले*

कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मित्रपरिवाराचा स्नेह मेळावा मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन ब्रह्मकुमारी साधक आणि माजी विद्यार्थी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या मेळाव्याला बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.

मेळाव्याच्या प्रारंभी ब्रह्मकुमारी साधक यांनी ‘या धावपळीच्या जीवनात शांती असणे किती गरजेचे आहे अन् ती ध्यानधारणेने कशी मिळवता येते.’ यावर सविस्तर विवेचन केले. यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. प्राची दळवी यांनी विषद केली. त्यानंतर या मित्रपरिवाराचे संस्थापक बाबू राणे यांनी परिवाराच्या वाटचालीचा आतापर्यंतचा समग्र आढावा घेतला.

त्यानंतर कासार्डे विद्यालयाचे माजी विद्यार्थी व केईएम हाॅस्पिटलच्या न्यूराॅलाॅजी विभागाचे डॉ. कौस्तुभ बावधनकर यांचे आरोग्यविषयक अभ्यासपूर्वक मार्गदर्शन झाले. या मार्गदर्शनाचा सध्या पन्नाशीपार असलेल्या माजी विद्यार्थ्यांना खूपच उपयोग झाला. यानंतर कासार्डे विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रकाश वाडेकर यांनी निसर्गोपचाराविषयी खूप मोलाची माहिती दिली. कॅन्सर, डायबिटीस, ब्लडप्रेशरसारख्या रोगांवर निसर्गोपचाराने कशी मात करता येते याचे अभ्यासपूर्वक विश्लेषण केले.

त्यानंतर दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांच्या मुलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दहावी, बारावी, पदवीधर, इंजिनीयर, वकील, डाॅक्टर झालेली आहेत त्यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आदित्य बाबू राणे,  अनुजा दिलीप राणे, आदित्य दिलीप राणे, आदिती संतोष राणे, आकाश वासुदेव तळेकर, पूजा अनंत तळेकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

सेवानिवृत्त माजी विद्यार्थ्यांचा सत्कार (चौकट)

सेवानिवृत्त माजी विद्यार्थ्यांचा यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मधुकर पवार (पीएसआय), शांताराम पारकर (बेस्ट), श्यामसुंदर दुधवडकर (बेस्ट), दिलीप राणे (सामना वृत्तपत्र), सौ. मनीषा पाटोळे (शिक्षिका), अनंत तळेकर (नाबार्ड बॅंक),  हरिश्चंद्र राणे (पोलीस खाते) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मधुकर पवार यांनी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा विषय घेऊन अगदी सुंदर मनोगत मांडले. तर दिलीप राणे, पारकर, श्यामसुंदर दुदवडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर या मित्रपरिवाराचे खर्‍या अर्थाने आधारस्तंभ आणि वरिष्ठ सल्लागार समीर कर्ले यांनी समारोपाचे अत्यंत अभ्यासपूर्वक भाषण केले. ‘तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या, दोघांच्या वेगवेगळ्या’ ही स्वरचित खुमासदार कविता सादर करून पन्नाशीनंतर तब्येत कशी सांभाळावी, एकमेकांना कसे समजून घ्यावे याचे बहुमोल मार्गदर्शन केले. मित्रपरिवाराच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा तसेच आगामी उद्दिष्टांचा थोडक्यात आढावा घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी सौ. प्राची दळवी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाबू राणे, समीर कर्ले, समीक्षा कर्ले, नंदिनी राणे, प्रकाश धुरी, संतोष राणे, दिलीप राणे यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी कमलेश तळेकर, वासुदेव तळेकर, स्नेहसुधा राणे, अनिता राणे, संताजी राणे तसेच गावावरून आलेले श्री. खानविलकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!