*कोकण Express*
*बचतगटांना विश्वासात घेत सर्वोतोपरी मदत करू – समीर नलावडे…!*
*सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पाककला स्पर्धा ; नवदुर्गा वस्ती स्तर संघ,बाजरपेठचे आयोजन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शहरातील महिला प्रत्येक गोष्टीत अग्रेसर आहेत.कणकवली शहराचे प्रथम नागरिक म्हणून महिलांनी बजावलेली कारकीर्द हे त्याचे उत्तम उदा.देता येईल.यापुढील काळात कोणताही कार्यक्रम करताना महिला बचतगटांना विश्वासात घेतले जाईल.शहरातील बचतगट हे स्तुत्य उपक्रम राबवत आले आहेत.कोरोनाचा काळ असल्याने आपण बाजारपेठ मर्यादित हि स्पर्धा राबवली असलीतरी पुढच्यावर्षी कणकवली शहरातील महिलांना एकत्र घेत भव्य दिव्य अशी स्पर्धा घ्या.त्याला सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत महिला आर्थिक विकास,महामंडळ सिंधुदुर्ग दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान DAY – NULM हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र कणकवली नगरपंचायत कणकवली यांच्या संयुक्तविद्यमाने नवदुर्गा वस्ती स्तर संघ,बाजरपेठ आयोजित पाककला स्पर्धेच्या कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.त्यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती प्रतीक्षा सावंत,नगरसेविका सुप्रिया नलावडे,कानकसिंधू CLFअध्यक्षा सूचिता पालव,नवदुर्गा ALF अध्यक्षा प्रिया सरुडकर,सचिव सायली लाड,APO अमोल भोगले,हिरकणी CMRE मॅनेजर,सीमा गावडे,परीक्षक सौ.वायंगणकर,तसेच ALF चे सर्व पदाधिकारी स्पर्धक उपस्थित होते. श्री.नलावडे पुढे म्हणाले,या शहरात महिलांना राजकीय प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे.यासाठी आपण शहरातील ५०० महिलांना एकत्र घेत बचतगटांच्या माध्यमातून काम उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात याज्ञवी कोदे या चिमुकलीने सावित्रीबाई यांची वेशभूषा केली होती.दरम्यान पत्रकार क्षेत्रातील उत्कृष्ट छायाचित्रकार मिळाल्या बद्दल अनिकेत उचले यांचा सत्कार करण्यात आला. पाककला स्पर्धेत बाजारपेठेतील २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या गंधाली शिरोडकर,व्दितीय- पूजा माणगावकर,तृतीय -प्रीती वाळके,उत्तेजनार्थ -पौर्णिमा मांगले व प्रिया सरुडकर यांना देण्यात आला.विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांचे हस्ते भेट वस्तू देवून गौरविण्यात आले.या कर्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सिद्धी नलावडे यांनी मानले.