आमदार नितेश राणे यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन श्री सदस्यांची केली विचारपूस

आमदार नितेश राणे यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन श्री सदस्यांची केली विचारपूस

*कोकण Express*

*आमदार नितेश राणे यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन श्री सदस्यांची केली विचारपूस*

*सुरू असलेल्या उपचारांची रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती*

मुंबई ;

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात प्रखर उष्णतेमुळे आजारी पडलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांची आमदार नितेश राणे यांनी पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेतली. प्रत्येक श्री सदस्या सोबत संवाद साधत त्यांची विचारपूस केली. प्रकृतीत कितपत आराम पडलेला आहे याबाबतची चौकशी केली.आमची प्रकृती सुधारत आहे.आम्हाला आता बरे वाटत आहे. रुग्णालयात उपचार योग्य पद्धतीने व्यवस्थित मिळत आहेत असे श्री सदस्यांनी आमदार नितेश राणे यांना सांगितले. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्याशीही चर्चा केली व उपचार पद्धतीची माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!