अवैध धंद्याची माहीती व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून पोलिसांना देणार

अवैध धंद्याची माहीती व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून पोलिसांना देणार

*कोकण Express*

*अवैध धंद्याची माहीती व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून पोलिसांना देणार…*

*प्रसाद गावडेंचा इशारा; मनसेच्या माध्यमातून कुडाळ पोलिसांना निवेदन…*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याची माहीती मनसेचे पदाधिकारी आता व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून पोलिसांना देणार आहेत.त्यानंतर पोलिसांनी अशा अवैध धंद्याची पाळेमुळे खणून काढावीत,असा इशारा मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला आहे.दरम्यान तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत यापुर्वीच पक्षाकडुन लक्ष वेधण्यात आले होते.मात्र त्या धंदेवाईकांशी काही पोलिसांचे हीतसंबंध असल्यामुळे दुदैवाने कारवाई होत नाही.त्यामुळे अवैध धंद्याच्या प्रकारात वाढ होत आहे,असे त्यांनी म्हटले आहे.याबाबत त्यांनी कुडाळ पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांना निवेदन दिले असून आता याबाबत पोलिसांनी योग्य ती कठोर भूमिका घ्यावी,अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कुडाळ तालुक्यात दिवसेंदिवस अवैद्य धंदे यांच्या प्रमाणात वाढवत आहे.या धंद्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.मात्र काही पोलिस कर्मचाऱ्यांचे या व्यवसायिकांशी हितसंबंध असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यामुळे अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी,अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान ही कारवाई करण्यासाठी आता मनसेचे पदाधिकारी व्हाट्सअप मेसेजच्या माध्यमातून पोलिसांना अवैद्य धंद्या बाबतची माहिती देणार आहेत ,असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!