*कोकण Express*
*कोकणात औषधी, सुगंधी वनस्पती लागवडीची शेती फायदेशिर*
*कोणार्क ऍग्रो इंडस्ट्रीज एलएलपी यांच्यावतीने कार्यशाळा*
निसर्गाच्या विविधतेने नटलेला सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या कोकणातील भौगोलिक परिस्थितीनुसार आपण योग्य नियोजन करून त्याप्रमाणे विविध व्यवसाय केले तर नक्कीच फायदा होणार याच पार्श्वभूमीवर औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड हा एक फायदेशीर शेती व्यवसाय होऊ शकतो किंबहुना ती काळाची गरज आहे. असे विचार जानवली येथे झालेल्या कार्यशाळेत उपस्थित मान्यवर व तज्ञांकडून मांडण्यात आले..
कोकण कोणार्क ऍग्रो इंडस्ट्रीज एलएलपी यांच्यावतीने कणकवली जाणवली येथील हॉटेल निलम कंट्री साईड येथे औषधी व सुगंधी वनस्पती लागवड विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेस शेतकरी व युवक यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कार्यशाळेस डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विज्ञान केंद्र, दापोलीचे डॉ. अजय राणे, डॉ. त्रिपाठी हे उपस्थित होते. तसेच सिमँप लखनौ या संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. राजीव वर्मा आणि डॉ. ऋषिकेश भिसे आणि या उद्योगा संबंधीच्या विविध योजना यांचे मार्गदर्शन करण्यासाठी आयुष पुणे या संस्थेचे डॉ. स्वप्नील शिंदे आणि ऋषिकेश फुंदे अशी तज्ञ मंडळी उपस्थित होती.