*कोकण Express*
*भाजपा तर्फे विकास कामांचा झंझावात गावात विवीध विकासकामे मंजूर…..*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावात विवीध विकासकामे मंजूर झाली. ह्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला. कित्येक वर्षाची मागणी असलेला मठ बोवलेकरवाडी येथील मोडक्या पुलाला ७५ लाखाचा निधी मंजूर झाल्याबद्दल मठ ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले. मठ गावातून वेंगुर्ले – बेळगाव रस्त्याला जोडणारा पुल मोडकळीस आल्यामुळे कित्येक वर्ष वाहतूक बंद होती, त्यामुळे ग्रामस्थांना लांबचा फेरा मारावा लागत होता, परंतु आता या पुलाच्या कामाचा शुभारंभ झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच मठ कणकेवाडी येथील कणकेश्वर देवस्थान येथील संरक्षक भिंत, तसेच मठ ग्रामपंचायत इमारतीवरील छप्पराचे काम व मठ कणकेवाडी ते आरमारकर घरापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डाबरिकरण इत्यादी चार कामांचा भूमीपूजन समारंभ संपन्न झाला.
विकास कामांना निधी कमी पडु देणार नाही राजन तेली
केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून – कोट्यावधी रुपयांचा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. तसेच उर्वरित विकास कामे ही लवकरच मंजूर होतील असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी राजन तेली यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मठ सरपंच रुपाली नाईक यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुक्याच्यक्ष सुहास गडळकर, रविंद्र शिरसाठ, शक्तीकेंद्र प्रमुख विजय बोवलेकर, युवा नेते अजित नाईक, उपसरपंच महादेव गावडे, बुथ अध्यक्ष उमेश धुरी व अनिल तेंडोलकर, सोसा. चेअरमन सुभाष बोवलेकर, माजी सरपंच दादा ठाकूर व धोंडु गावडे, ग्रामपंचायत सदस्य नम्रता बोवलेकर शमिका धुरी सोनीया मठकर सिद्धी गावडे, सुनील बोवलेकर, विद्याधर गावडे, भरत ठाकूर, – प्रसाद मठकर युवा मोर्चाचे समीर नाईक व प्रशांत बोवलेकर, उमेश मठकर, अरुण ठाकूर, संजय बागायतकर, स्वमील धुरी, महेश धुरी बाळु धुरी, दामिनी धुरी नम्रता धुरी, चंद्रकांत ठाकूर, नितीश कांबळी बाबी होडावडेकर, ज्ञानेश्वर बोवलेकर, भगिरथ बागायतकर मिलिंद मराठे, महेश बागायतकर, वामन गावडे सर, निलेश गावडे, देवेंद्र गावडे, किशोर गावडे, प्रकाश गावडे, गौरव गावडे, सतिश गावड़े नविन गावडे, यशवंत गावडे, सुधिर गावडे, प्रसाद गावडे, विलास गावडे, अंकुर गावडे, अनंत वायंगणकर, नीवृत्ती आरमारकर, कुणकेरकर परब तसेच बरेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र खानोलकर यांनी केल.