दापोलीत ३० एप्रिलला भव्य सायकल स्पर्धा; एक लाखाची बक्षिसे

दापोलीत ३० एप्रिलला भव्य सायकल स्पर्धा; एक लाखाची बक्षिसे

*कोकण Express*

*दापोलीत ३० एप्रिलला भव्य सायकल स्पर्धा; एक लाखाची बक्षिसे*

*महाराष्ट्रातून, राज्याबाहेरील अनेक सायकलस्वार दापोलीत येणार*

*दापोली ःःप्रतिनिधी* 

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी दापोली समर सायक्लोथॉन २०२३, सिद्दान ३ स्पर्धेचे आयोजन आझाद मैदान दापोली येथे करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत.

ही सायकल स्पर्धा १ ते ६० किमी असून शॉर्ट सिटी लूप ६० किमी कोस्टल सिनिक रूट ३० किमी, २१ किमी सायकल रेस खुला गट, महिला गट, MTB, सिंगल गिअर अशा गटात होणार आहे. सायकल रेस खुला गट बक्षिसे १११११, ७७७७, ५५५५,३३३३, ११११ रुपये व चषक आणि महिला गट, MTB, सिंगल गिअरसाठी प्रत्येकी ५०००, ३०००, १००० व चषक अशी बक्षिसे असतील. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शिवाय ५०+ लकी ड्रॉ बक्षिसे पण असतील. ६० किमी सायक्लोथॉन मार्ग आझाद मैदान दापोली ते हर्णे, आजले, आडे उटंबर दापोली असा असेल. राईड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, मेडिकल मदत असेल. १ व २ किमीची फन राईड विनामूल्य असेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!