STS परीक्षेत शाळा कणकवली क्रमांक तीन चे सुयश इयत्ता सहावीचा वरद बाक्रे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत एकोणचाळीसावा

STS परीक्षेत शाळा कणकवली क्रमांक तीन चे सुयश इयत्ता सहावीचा वरद बाक्रे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत एकोणचाळीसावा

*कोकण Express*

*STS परीक्षेत शाळा कणकवली क्रमांक तीन चे सुयश
इयत्ता सहावीचा वरद बाक्रे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत एकोणचाळीसावा*

कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय शाळा कणकवली क्रमांक तीन चा इयत्ता सहावीचा विद्यार्थी कु वरद उदय बाक्रे 200 पैकी 158 गुण मिळवून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत 39 वा आला आहे तर इयत्ता सहावीच्या संतोषी सुशांत आळवे 154 गुण गोल्ड मेडल, सम्यक चंद्रकांत पुरळकर 146 गुण सिल्वर मेडल, किंजल जयवंत रेवाळे १२२ गुण ब्राँझ मेडल, व संजना सदानंद कांबळे 112 गुण ब्राँझ मेडल मिळवले आहे त्यांना वर्ग शिक्षिका श्रीमती प्रतिभा कोतवाल यांच्यासह श्रीमती अक्षया राणे व श्री नितीन जठार यांचे मार्गदर्शन लाभले
इयत्ता दुसरीच्या गौरेश संतोष सावंत 152 गुण गोल्ड मेडल अनामी अमोल कांबळे 148 गुण सिल्वर मेडल भार्गवी गणेश पारकर 146 गुण सिल्वर मेडल संस्कृती जयवंत रेवाळे 128 गुण ब्राँझ मेडल कश्यप विजय वातकर 126 गुण ब्राँझ मेडल व हर्षाली निलेश चव्हाण 114 गुण ब्राँझ मेडल मिळवले आहे त्यांना वर्गशिक्षिका श्रीमती अश्विनी साटम यांचे मार्गदर्शन लाभले
इयत्ता तिसरीच्या मयंक रविकांत बुचडे यांने 134 गुण सिल्वर मेडल प्राप्त केले आहे त्याला वर्ग शिक्षिका श्रीमती स्वाती कदम यांचे मार्गदर्शन लाभले
या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ वर्षा करंबेळकर यांनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रविंद्र सावंत उपाध्यक्ष सौ सायली राणे यांनी विशेष अभिनंदन केले आहे या सर्व विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून खूप कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!