*कोकण Express*
*माजी आमदार प्रमोद जठार यांच्या 58 वा मोठ्या उत्साहात होणार साजरा*
*19 एप्रिल रोजी वाढदिवसादिनी भरगच्च कार्यक्रमाचे “कासार्डे तिठा ” येथे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
माजी आमदार, सिंधुरत्न समृद्ध योजना समितीचे सदस्य, तथा महाराष्ट्र भाजपा प्रदेश सचिव प्रमोदजी जठार यांच्या 58 वा वाढदिवस बुधवार 19 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या सोहळ्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार डॉ. निलेश राणे, आमदार नितेश राणे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा नेत्या चित्रा वाघ, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संध्या तरसे, भाई सावंत,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. स्थानिक कलाकारांच्या खास आग्रहास्तव ऋतुवेद प्रस्तुत “स्वर झंकार” या गीत, गझल, नाट्य, नृत्य कार्यक्रमाचे देखील आयोजन प्रमोद जठार यांचे निवासस्थान असलेल्या कासार्डे तिठा येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी तसेच प्रमोद जठार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक प्रमोद जठार मित्रमंडळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.