*कोकण Express*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका समाजापुरते बंदिस्त करू नका ; प्रा.संतोष जोईल…*
*सिद्धार्थ नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…*
*फोंडाघाट ःःप्रतिनिधी*
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका समाजापुरते बंदिस्त करू नका =प्रा.संतोष जोईल फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा फोंडाघाटच्या वतीने सिद्धार्थ नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे अध्यक्ष जयंत जाधव मंडळाचे अध्यक्ष संतोष कदम सेक्रेटरी प्रा.संतोष आखाडे महिला मंडळ अध्यक्ष श्र्वेता आखाडे सेक्रेटरी सुमेधा जाधव माझी अध्यक्ष संजय तांबे माजी सरपंच मिलिंद जाधव निलेश जाधव कविता जाधव (ग्रामपंचायत सदस्य फोंडाघाट) सतीश कदम ,उमाकांत जाधव ,विजय जाधव ,रामचंद्र कदम देवेंद्र कांबळे, सुनिल जाधव, संदीप जाधव,प्रकाश सो.जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.सुरवातीस सर्वांचे स्वागत करण्यात आले.प्रा.संतोष जोईल सरांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी विचार व्यक्त करताना प्रा.संतोष जोईल म्हणाले बाबासाहेबांना एका समाजापुरते बंदिस्त करू नका.बाबासाहेब देशाचे भारतरत्न आहेत. त्यांच्या विचारांची आज देशाला गरज आहे. देश महासत्ता बनायची असेल तर बाबासाहेबांचे विचार अमलात आणणे गरजेचे असून त्या पद्धतीने युवकांनी वाटचाल केली पाहिजे.त्या काळात बाबासाहेबांनी परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेऊनआपल्या शिक्षणाचा उपयोग देशासाठी आणि आपल्या समाजासाठी फक्त न करता इतर समाजाचा सुद्धा विचार करून त्यांच्यासाठी सुद्धा त्या पद्धतीचे कायदे तयार केले.म्हणूनच बाबासाहेबांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.बाबासाहेबांनी आपल्याला जगायचं कसं अन्यायाविरुद्ध लढायचं कसंआणि डोळ्यासमोर उच्च स्वप्न ठेवून ते पूर्ण करायचे कसे ही प्रेरणा बाबासाहेबांनी दिली.कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र बँकेतून सेवानिवृत्त झालेले रामदास जाधव या दोन्ही उभयतांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा प्रश्नमंजुषा व महिलांसाठी फनी गेम व संगीत खुर्ची तसेच रात्री मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले या सर्व कार्यक्रमाचे आभार मिलिंद जाधव यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.