देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये सत्तांतर

देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये सत्तांतर

*कोकण Express*

*देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये सत्तांतर….*

*राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांचा भाजपात प्रवेश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी सत्ताधारी ठाकरे सेना राष्ट्रवादी गटातून बाहेर पडत असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका मिताली सावत यांनी भाजपला समर्थन दिल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये भाजपाचे ८ आणि मिताली सावंत असे एकूण ९ तर शिवसेनेचे ७ असे बलाबल झाले आहे. अखेर.. आ. नितेश राणे यांनी देवगड नगरपंचायतची सत्ता काबीज केली आहे..

या राजकीय नाट्यमय घडामोडी भाजपा आमदार नितेश राणे घडवल्या आहेत, देवगड नगरपंचायत वर पुन्हा भाजपचा झेंडा फडकणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झालेल्या एकमेव नगरसेविका असलेल्या मिताली सावंत यांनी शिवसेनेच्या ८ नगरसेवकांसोबत गट स्थापन केला होता. आता शिवसेनेचे रोहन खेडेकर हे नगरसेवक कायदेशीर अपात्र ठरल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायतमध्ये भाजपाचे ८ आणि सत्ताधारी सेना राष्ट्रवादी गटाचे ८ असे बलाबल होते. मात्र आता मिताली सावंत यांनी सेनेच्या गटाची साथ सोडत भाजपला समर्थन दिल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये भाजपाची सत्ता आली आहे. शिवसेना ठाकरे गटाला हा जोरदार धक्का जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!