*कोकण Express*
*तळेरे येथील पोस्ट ऑफिसची नवीन सुसज्ज व सर्व सुविधायुक्त इमारत होणे*
*माजी मंत्री सुरेश प्रभू यांना बांधकाम सभापती रवींद्र जठार यांनी दिले निवेदन*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील तळेरे पंचक्रोशी अंतर्गत गावांना मध्यवर्ती ठिकाण हे मौजे तळेरे हे राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या लगत आहे.मौजे तळेरे येथे सद्या कार्यरत असलेले पोस्ट ऑफिस हे भाड्याचे जागेत आहे. मौजे तळेरे येथे केंद्रीय पोस्ट खात्याचे मालकीची जागा उपलब्ध आहे.तरी सदरचे ठिकाण सुसज्ज व सर्व सुविधा युक्त पोस्ट इमारत होणेसाठी आपले स्तरातून पाठपुरावा करण्यात यावा अश्या प्रकारचे निवेदन माजी मंत्री सुरेश प्रभू यांना बांधकाम सभापती रवींद्र जठार यांनी दिले, यावेळी सुरेश प्रभू यांनी तळेरे पोस्ट ऑफिस चा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.