निरोम, मठबुद्रुक येथील विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने

निरोम, मठबुद्रुक येथील विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने

*कोकण Express*

*निरोम, मठबुद्रुक येथील विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने*

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून निरोम आचरेकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख व मठबुद्रुक मुख्य रस्ता ते गोलतकर घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण करणे या कामासाठी ५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे.या कामांची भूमिपूजने रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार व्यक्त करत त्यांचा सत्कार केला.
यावेळी युवासेना कणकवली उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, आडवली मालडी विभागप्रमुख बंडू चव्हाण, विभाग संघटक संतोष घाडी,जेष्ठ शिवसैनिक दुलाजी परब, युवासेना विभागप्रमुख बंडू गावडे, निरोम शाखा प्रमुख विनायक राऊत, प्रल्हाद राऊत,पांडुरंग राऊत,सुभाष मांजरेकर,संतोष गोलतकर, मठ बु. ग्रा.प. सदस्य संतोष पाणवलकर, ग्रा.प. सदस्या सौ. मेस्त्री, पुरुषोत्तम नारिंगेकर, सुधाकर आचरेकर, बाबा आचरेकर, अमित मेस्त्री, आबा सावंत आदींसह निरोम व मठबुद्रुक येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!