*कोकण Express*
*सिंधुदुर्गचा पर्यटनाबरोबर अध्यात्मिकदृष्ट्या विकास करण्यासाठी
प्रयत्न सुरू….*
*दीपक केसरकर, जिल्ह्याचा विकास करायचा आहेच, पण सावंतवाडीवर अधिकचा लक्ष…..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
साईबाबा हयात असताना कविलकाटे येथे साई मंदिर, तर स्वामी समर्थांच्या पादुका वेंगुर्ल्यात असल्याने तसेच साटम महाराज राऊळ महाराज अशी अनेक संत लाभल्याने सिंधुदुर्ग हा भक्तीमार्गातील लोकांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा पर्यटना बरोबरच अध्यात्मिकदृष्ट्या विकास होण्यासाठी पर्यत सुरू आहेत. अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली. दरम्यान मी राज्याचा मंत्री असलो तरी राज्याचा विकास डोळ्यासमोर आहे. परंतु जिल्ह्याचा आणि विशेषतः या ठिकाणी घर असल्याने सावंतवाडीवर अधिकचा लक्ष देणार आहे, असेही श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.
सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात आज स्वामींच्या मुळ छायाचित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. केसरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रदर्शनाचे प्रमुख तथा वेंगुल्यांचे सुपुत्र संजय वेंगुर्लेकर, सचिन वालावलकर, नंदू शिरोडकर, आबा केसरकर, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, दिपाली सावत, शैलेश जाधव, विश्वास घाग आदी उपस्थित होते. दरम्यान भक्ती मार्गातून चांगले काम होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वामींच्या चित्र प्रदर्शनाचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

