पणजी गोवा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पणजी गोवा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

*कोकण Express*

*पणजी गोवा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*

भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र पणजी आणि युथ होस्टेल च्या संयुक्त विद्यमाने पणजी गोवा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अंकुश जाधव यांनाविशेष निमंत्रित करण्यात आले होते.श्री जाधव यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी माजी सभापती जाधव यांनी युवकांना संबोधित करताना म्हटले की, वेगवेगळे असले तरी संविधानाने आपल्याला एकसंघ ठेवले आहे. पण संविधानाचा प्रसार आणि प्रचार जनसामान्यांपर्यंत जसा व्हायला हवा तसा दुर्दैवाने झालेला नाही जसं आपण हक्कासाठी आणि अधिकारासाठी भांडतो तशीच आपण आपली कर्तव्य सुद्धा निभावली पाहिजे.ज्या दिवशी आपण बाबासाहेबांच्या विचाराने आणि संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्य प्रामाणिकपणे अमलात आणू तो दिवस खऱ्या अर्थाने आपल्याला महासत्तेकडे घेऊन जाणारा असाच असेल असे जाधव यांनी पणजी गोवा येथे बोलताना स्पष्ट केले.
पणजी गोवा येथील युथ होस्टेलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विचार मंचावर प्रशासकीय अधिकारी तथा युथ हॉस्टेलचे व्यवस्थापक के के घाटवळ, सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वकील हर्षदा नाईक, गोवा मडगाव जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकारी सुप्रिया मांजरेकर, व अन्य मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी केलेले महान कार्य आणि संविधान यामुळे देश आज एकसंघ आहे त्यांनी आपल्या जीवनात खूप मोठा संघर्षाचा लढा उभा केला शोषित,वंचित,पीडित कष्टकरी,कामकरी,शेतकरी महिला, दलित,वंचित या सगळ्यांसाठीच मोठं काम केलेलं आहे त्यामुळेच आज या सर्वांची प्रगती त्यांचे हे उपकार आपल्याला विसरून चालता येणार नाही त्यांचे प्रेरणादायी विचार आपण सगळ्यांनी पुढे घेऊन गेले पाहिजेत. त्यांच्या विचारांची आज देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे तरच आपण महासत्तेकडे वाटचाल करू शकतो असे मत श्री जाधव यांनी बोलताना व्यक्त केलं.
केके घाटवळ यांनी माजी सभापती अंकुश जाधव यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचे कौतुकही केले. ते म्हणाले जाधव यांनी खुप मोठा संघर्ष केला. काही वर्षापूर्वी हा अंकुश नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मध्ये एक स्वयंसेवक म्हणून दाखल झाला होता. त्यांनी पत्रकार म्हणूनही काही वर्षे यशस्वी काम केले.या व्यासपीठाने अनेक तरुण घडविले त्यापैकीच एक जाधव आहे. त्याने केलेला परिस्थितीशी संघर्ष आणि त्यातून जिल्ह्याला मिळाला एक लोकप्रतिनिधी समाजाला दिशा देणार नेतृत्व म्हणून आज त्यांची ओळख सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. हे त्यांना अगदी सहज मिळाले नाही यासाठी त्यांना खूप मेहनत,जिद्द आणि मोठा संघर्ष करावा लागला आहे. म्हणूनच आजच्या पवित्र दिवशी बाबासाहेबांच्या जयंती उभे राहिलेले धगधगत सिंधुदुर्गाचे नेतृत्व गोव्यातील तरुणाईला अभ्यासाव याव आणि जवळून पाहता यावं म्हणून त्यांना आज प्रमुख पाहुणे म्हणून येथे मी विशेष निमंत्रित केले आहे.अशा शब्दात अंकुश जाधव यांचा घाटवळ यांनी कौतुक आणि गौरव केला.
यावेळी वकील नाईक व अन्य मान्यवर यांनी विचार व्यक्त केले. माझी सभापती जाधव यांच्यासारख्या आलेल्या नेतृत्वाचा गोवा येथे विशेष कौतुक होणे हे विशेष बाब आहे असं अनेक मान्यवर यांनी बोलताना व्यक्त केले सूत्र सूत्रसंचालन आणि आभार कात्यायनी घाटोळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!