*कोकण Express*
*वायंगणी नळ पाणी टाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल होऊन कारवाई न झाल्यास 1 मे रोजी उपोषणाचा इशारा*
*वेंगुर्ले ःःप्रतिनिधी*
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गावातील सातार्डेकरवाडी येथील लघू नळ पाणी योजनेच्या पाण्याची टाकी चोरणाऱ्यावर पोलीस स्टेशन ला रितस गुन्हा दाखल करून या प्रकाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची 30 एप्रिल पर्यंत चौकशी न झाल्यास एक मे महाराष्ट्र दिनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र सातार्डेकर व भिकाजी गावडे यांनी वेंगुर्ले पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे
महाशय
वायंगणी ग्रामपंचायत कडून आवेरे धनगरवाडी सातार्डेकरवाडी येथील लोकांची पाण्याची गैरसोय दूर व्हावी याकरिता सन 2017 / 2018 मध्ये चौदाव्या वित्त आयोगातून शासनाचा लाखो रुपये निधी खर्च करून लघू नळ पाणी योजना कार्यान्वित करण्यात आली होती या नळ पाणी योजनेच्या पाण्याची टाकी सातार्डेकरवाडी येथे बसविण्यात आली होती ही टाकी चोरीस गेल्या बाबत 3 मार्च 2023 रोजी वायंगणी ग्रामपंचायतीचे प्रशासक यांचे जवळ लेखी अर्ज देऊन याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु सदर अर्ज देऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असला तरी आमच्या अर्जाची कोणतीही दखल घेतलेली नसल्याने याप्रकरणी उपोषण छेडून आपल्याकडे न्याय मागण्याचा मार्ग पत्करावा लागत आहे . तरी 30 एप्रिल पर्यंत या शासकीय मालमत्तेच्या चोरी प्रकरणी आपल्याकडून पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात यावा व या प्रकरणात पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची योग्य ती चौकशी करण्यात यावी अन्यथ 1 मे महाराष्ट्र दिन वेंगुर्ले पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण छेडून आपले लक्ष वेधून घ्यावे लागतील.तरी तात्काळ गुन्हा दाखल करून या प्रकाराला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून न्याय मिळावा असे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.