*कोकण Express*
*देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायत बिनविरोध भाजपाकडे*
*आम.नितेश राणे यांनी केले विजयी सदस्यांचे अभिनंदन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीकडे बिनविरोध आली आहे. सात ग्रामपंचायत सदस्य असलेली ही ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध भाजपा कडे आली असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रारंभीच विजयाची नांदी सुरू झाली आहे.या निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी पक्षाची शाल,पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.
मोंडपार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या सौ.स्मिता प्रदीप अनभवने,भक्ती भगवान मोंडे,कवीता राजेंद्र टुकरल, गणेश बाबला तिर्लोटकर,संदेश जगन्नाथ अनभवने, भिकाजी बाळकृष्ण तांबे,नम्रता अनिल राणे हे सात सदस्यांनी कणकवलीत ओम गणेश निवास्थानीं आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश राणे, जेष्ठ ग्रामस्थ चंद्रकांत मोंडे,तंटामुक्ती अध्यक्ष भगवान मोंडे,तानाजी राणे, प्रकाश राणे,राजेंद्र टूकरल,संदीप तिर्लोटकर,माजी सरपंच सुरेश पुजारे,संतोष तिर्लोटकर,प्रमोद राणे, अर्चना राणे,प्रथमेश राणे, शैलेश राणे,हर्ष तिर्लोटकर आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थत होते.तालुका अध्यक्ष रवी पाळेकर यांनीही या विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

