*कोकण Express*
*आजपासून कासार्डे हायस्कूल येथे जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा शिबिराचा प्रारंभ*
*कासार्डे ; संजय भोसले*
शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, सिंधुदुर्ग आयोजित, वैभववाडी तालुका कबड्डी असोसिएशन च्या सहकार्याने आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने आज शनिवार दि. 15 पासून कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे जिल्हास्तरीय पंच परीक्षा शिबिराला प्रारंभ दु.२वा होत आहे. ही पंच परीक्षा व शिबिर शनिवार रविवारी सलग दोन दिवस सुरू राहणार आहे.
या शिबिराचा प्रारंभ कासार्डे शिक्षण संस्थेचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,माजी कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर,स्कुल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर तसेच शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग अध्यक्ष बयाजी बुराण, कार्याध्यक्ष शैलेश नाईक, सचिव दिनेश म्हाडगुत, कासार्डे विद्यालयाचे प्राचार्य एम.डी. खाड्ये, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे प्र.अध्यक्ष अॅड.अजित गोगटे, वैभववाडी तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप रावराणे, जिल्हा पदाधिकारी मार्टीन अल्मेडा, संजय पेडणेकर, राष्ट्रीय पंच सुहास पाटील (रायगड), मनोज जाधव (सातारा), संतोष भोसले (रत्नागिरी),अजित पाटील (कोल्हापूर,) व मधुकर पाटील (सिंधुदुर्ग), व कासार्डे हायस्कूलचे पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होणार आहे.