*कोकण Express*
*सावंतवाडीत भाजपाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील भाजपाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली*
यांच्याहस्ते समाज मंदिर येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावले, सरचिटणीस परिक्षित माजरेकर, विनोद सावंत, माजी नगरसेवक आनंद नवगी, मनोज नाईक, दिपाली भालेकर, सत्यवान बांदेकर, दिलीप भालेकर, अॅड. अनिल निरवडेकर, साईनाथ जामदार, बंटी पुरोहीत, हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते.

