आता पदवीधर डी.एड.शिक्षक ‘क’ श्रेणी मध्ये* :*शासनाचे राजपत्र प्रसिद्ध

आता पदवीधर डी.एड.शिक्षक ‘क’ श्रेणी मध्ये* :*शासनाचे राजपत्र प्रसिद्ध

*कोकण Express*

*आता पदवीधर डी.एड.शिक्षक ‘क’ श्रेणी मध्ये* :*शासनाचे राजपत्र प्रसिद्ध*

*कासार्डे ; संजय भोसले*

खाजगी शाळेतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेसाठी असलेल्या महाराष्ट्र खाजगी शाळा (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मध्ये दुरुस्ती करून पदवीधर डी. एड शिक्षकांचा समावेश आता ‘क’ श्रेणीत होणार असल्याचे राजपत्र प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणिक अर्हता वाढवूनही सेवाज्येष्ठता व पदोन्नतीपासून दूर रहावे लागणा-या डी.एड शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती नियमावली 1981 मधील नियम 12 अनुसूचि ‘फ’ मध्ये सेवा जेष्ठता व पदोन्नतीच्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत.
माध्यमिक शाळेतील
शिक्षकांची ज्येष्ठता, प्रवर्गनिहाय दिली आहे. मात्र डीएड शिक्षकांचा कोणत्याही प्रवर्गात समावेश करण्यात आलेला नव्हता. परिणामी डी. एड शिक्षकांनी अगदी पदव्युत्तर पदवी संपादन केली,तरीही त्यांना सेवाज्येष्ठतेत डावलले जात होते.त्यांना पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक या पदावर पदोन्नती मिळत नव्हती. तो अन्याय दूर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून डी.एड शिक्षकांनी शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठवले.
गेली 40 वर्षे तो लढा सुरू आहे. सर्वत्र नेमणूक दिनांकानुसार सेवाजेष्ठता यादी तयार करून त्यानुसार पदोन्नती दिली जाते, तशी ती डी.एड शिक्षकांनाही देण्यात यावी अशी त्यांची आग्रही मागणी आहे.
डी.एड शिक्षकांचा समावेश’क’ श्रेणीत झाल्याशिवाय पदोन्नतीचा मिळणे अशक्य असल्याचे संघटनेने सर्व स्तरांवर त्यासाठी रान उठविले,मोर्चे,आंदोलने केली. शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, राज्यपाल, शिक्षण मंत्री आदी सर्वांना हजारोंच्या संख्येने पत्र पाठवली, ईमेल केले. त्याची दखल घेत शासनाने प्रवर्ग ‘क’ च्या दुरुस्तीबाबत ८ जून 2020 ला अधिसूचना निर्गमित करून हरकती मागवल्या. हजारो शिक्षकाने हरकती नोंदवल्या मात्र 3 वर्षे उलटूनही अधिसूचनेची कार्यवाही होत नसल्याने पुन्हा संघटनेने राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, अवर सचिव, शिक्षण संचालक, उपसंचालक व शिक्षणाधिकारी अशा उच्च पदस्त अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या वारंवार भेटी घेऊन निवेदन दिली, पाठपुरावा केला आणि त्यानुसार सरकारने नुकतेच राजपत्र प्रसिद्ध करून त्यामध्ये पदवीधर डी.एड प्रवर्गाला’क’ श्रेणी स्थान दिले आहे. त्यामुळे पदोन्नतीपासून दूर राहावे लागणाऱ्या डी.एड. शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासनाने अधिसूचना काढावी यासाठी शासकीय स्तरावर महाराष्ट्र राज्य पदवीधर डी.एड.व कला शिक्षक शिक्षकेतर संघ या संघटनेचे अध्यक्ष दिलीप आवारे उपाध्यक्ष दीपक अंबावकर सचिव महादेव माने व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलनासह, पाठपुरावा करून, शासनाला अधिसूचना काढण्यास भाग पाडले. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष संजय जाधव व सचिव प्रशांत गोसावी यांनी दिली.

*शिक्षण विभागाने तातडीने अंमलबजावणी करावी*
शासनाने राजपत्रद्वारे खाजगी शाळा सेवाशर्ती नियमावलीत केलेल्या बदल स्वागतार्ह आहे. शिक्षण विभागाने त्याची तातडीने अंमलबजावणी करून अन्यायग्रस्त डी.एड, कला व क्रीडा शिक्षकांना न्याय द्यावा.

श्री.दिलीप आवारे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र राज्य पदवीधर डी.एड.,कला-क्रीडा शिक्षक – शिक्षकेतर संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!