*कोकण Express*
*कत्तलखान्यात गुरे घेउन जाणारा आयशर टेम्पो कणकवली पोलिसांनी पकडला..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अमानूष पणे गुरांना आयशर टेम्पो मध्ये कोंबून कत्तलखान्यात घेऊन जात असताना कणकवली पोलिसांनी कारवाई करीत चालक आसिफ महमद इसाक सिराज वय ३५रा आजरा, गाडी मालक उस्मान उर्फ ताहीर मुनाफ जमादार वय २५ नेसरी गडहिंग्लज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन गुरांशा सुडकोली येथील गोशाळेत पाठविले आहे. कणकवली पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 93/ 2023 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 ch 11 (1) (e) 11(1) (f), 11(1)(h), 11 (k) महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) दाखल करण्यात आले आहे.